ताज्या अंकातील लेख
पुस्तक परीक्षण – गुरुजी,तू मला आवडला
– सौ. विजया कैलास हिरेमठ — पुस्तक परीक्षण पुस्तकाचे नाव-गुरुजी,तू मला आवडला. लेखक – युवराज माने प्रकाशन- दिलीपराज प्रकाशन,पुणे मूल्य- २८०₹ शिक्षणाची गगनचुंबी इमारत उभी करण्यासाठी सर्वप्रथम त्या इमारतीचा पायाच मजबूत असणं महत्वाचं आहे. मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या भक्कम पायावरच त्यांची
शिक्षणयात्रीमध्ये नेमके काय आहे?
शिक्षकांचं हक्काच अभिव्यक्तिपीठ म्हणजे ‘शिक्षणयात्री’
शिक्षणाचा केवळ साक्षर बनविणे हा मर्यादित हेतू नसतोच कधी.शिक्षण म्हणजे खुप काही असलं तरी शिक्षणानं माणुसपण जागलं जावं, आपल्या अंगभूत कलागुणांना संस्कारांची जोड मिळावी यासारख्या अपेक्षा या असणारंच! केवळ खुप शिकला म्हणुन कृत्रिम बडेजावापेक्षा माणुसकी जपणारी माणसं दिसली तर ठिक नाहीतर ” समृध्द ” शिक्षणाची उणीव भासते…असं का?
संस्कारी माणुस होणं हे महत्त्वाचे . व्यक्तीमत्व विकासाच्या प्रवासातील तो एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे . त्यातूनच व्यक्तिमत्व आकार घेत असते. त्याला एक नवी दिशा मिळत असते. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होऊन ते सर्वार्थाने आकार घेत असते. हा सारा प्रवास होत असताना सामाजिक परिस्थिती, होणारे संस्कार आणि शाळेतून मिळणारे शिक्षण या गोष्टी अर्थात खूप महत्त्वाच्या असतात.अशावेळी कर्त्या शिक्षकांचा… संस्कारी शाळांचा शोध घेऊन त्यांचं काम सर्वासमोर आलं पाहिजे,इतरांना प्रेरणा मिळायला हवी .या मौलिक विचारानं मा. पुरुषोत्तम भापकर (तत्कालीन शिक्षण आयुक्त) व शिक्षणयात्री परिवारातील सदस्यांचे चिंतन सुरू होतं. आणि या चिंतनातूनचं ‘शिक्षणयात्री’ मासिकाचा जन्म झाला.