ताज्या अंकातील लेख
तस्मे श्री गुरुवे नमः
तस्मे श्री गुरुवे नमः आयुष्यात भेटलेल्या प्रत्येकाला मी गुरुच्या रुपात पाहतो. प्रत्येकाकडून काहींना काही शिकण्या सारखे असते. त्याचेकडे जे चांगले आहे ते माझ्या पदरी घेण्याचा प्रयत्न नेहमीच राहतो. या बरोबरच माझी कारकीर्द यशस्वी करण्यात आई, काकू, कुटूंब, मित्र, समाज या
यू आर नॉट स्पेशल!
असा इकडे ये…आलास ! आता मुलांकडे तोंड करून उभा राहा !’सर सांगत होते आणि मी हसत हसत त्यांचे आदेश पाळत होतो. अचानक सप्पदिशी आवाज झाला. सर्वांग बधीर झाले. थोड्या वेळाने जाणीव परतली तेव्हा माझ्या निळ्या हाफ पॅन्टखालच्या पोटरीवर हिरवागार वळ
आकाशी झेप घ्या रे लेकरांनो…
श्री. भामरे बापू ॥ आकाशी झेप घ्या रे लेकरांनो ॥ ==========©MK भामरे.बापु हो खरच..,. आंतर्राष्र्टीय समस्यांवर चर्चाकरतांना हे दोन तरुण गौरव व गजानन.. काय बरे चर्चा करत असतील हो हे? भडकणार्या महागाईची? राजकारणाच्या अवमुल्यनची? ग्लोबल वार्मिंगची? की ढासळणार्या मुल्यांची? नाही..!
शिक्षणयात्रीमध्ये नेमके काय आहे?
शिक्षकांचं हक्काच अभिव्यक्तिपीठ म्हणजे ‘शिक्षणयात्री’
शिक्षणाचा केवळ साक्षर बनविणे हा मर्यादित हेतू नसतोच कधी.शिक्षण म्हणजे खुप काही असलं तरी शिक्षणानं माणुसपण जागलं जावं, आपल्या अंगभूत कलागुणांना संस्कारांची जोड मिळावी यासारख्या अपेक्षा या असणारंच! केवळ खुप शिकला म्हणुन कृत्रिम बडेजावापेक्षा माणुसकी जपणारी माणसं दिसली तर ठिक नाहीतर ” समृध्द ” शिक्षणाची उणीव भासते…असं का?
संस्कारी माणुस होणं हे महत्त्वाचे . व्यक्तीमत्व विकासाच्या प्रवासातील तो एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे . त्यातूनच व्यक्तिमत्व आकार घेत असते. त्याला एक नवी दिशा मिळत असते. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होऊन ते सर्वार्थाने आकार घेत असते. हा सारा प्रवास होत असताना सामाजिक परिस्थिती, होणारे संस्कार आणि शाळेतून मिळणारे शिक्षण या गोष्टी अर्थात खूप महत्त्वाच्या असतात.अशावेळी कर्त्या शिक्षकांचा… संस्कारी शाळांचा शोध घेऊन त्यांचं काम सर्वासमोर आलं पाहिजे,इतरांना प्रेरणा मिळायला हवी .या मौलिक विचारानं मा. पुरुषोत्तम भापकर (तत्कालीन शिक्षण आयुक्त) व शिक्षणयात्री परिवारातील सदस्यांचे चिंतन सुरू होतं. आणि या चिंतनातूनचं ‘शिक्षणयात्री’ मासिकाचा जन्म झाला.