समाजभान
शिक्षणयात्री मासिकाने समृध्द शिक्षण संस्काराचे ब्रीद जपतानांच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव राखली आहे. समाजातील वंचित घटकांना नेहमीच मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. मदतीचे स्वरूप छोटे असो व मोठे, वस्तू स्वरूपात असो व देणगी मात्र होता होईल तेवढी मदत मासिक शिक्षणयात्री परिवार करतेच.
आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असो, दिवाळीचा फराळ, पालकांचे आरोग्य शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, स्वच्छता अभियान, मतदान जनजागृती, यासह सामाजिक कार्यक्रमात शिक्षणयात्री मासिक व परिवार हिरीरीने सहभागी असतो.
करोना संकट काळात पंतप्रधान मदतनिधी, मुख्यमंत्री मदतनिधी यात आर्थिक सहकार्य करून खारीचा वाटा उचलण्याचे समाधान शिक्षणयात्री परिवाराला लाभले आहे.
स्पर्धा
वाचन लेखन चळवळीच्या माध्यमातून शिक्षक – पालक – विद्यार्थी यांना लिहीते करण्याची संधी शिक्षणयात्री मासिकाने दिली आहे. ‘आपणही लिहू शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते आहे. काय वाचावं? कस लिहावं? यासाठी वाचन – लेखन कार्यशाळा घेण्याबरोबर मान्यवरांची व्याख्यानं आयोजित करण्यात येत आहे.
तसेच राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, कथालेखन स्पर्धा, काव्यस्पर्धांच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षक पालकांना लेखनांचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.