समृद्ध शिक्षण संस्कारांसाठी...!

ताज्या अंकातील लेख

पुस्तकं गुणगुणतात

पुस्तकं गुणगुणतात आईला आम्ही माई म्हणत असू.शिक्षा करण्याची माईची सवय जगावेगळी होती (हे आता जाणवतं!) खोड्या केल्या,चूक गंभीर असली किंवा शेजारपाजारच्या कोणी तक्रार केली तर पाण्यासाठीच्या एका पितळी पिंपात पाण्यात उभं राहण्याची आणि असं उभं असतांना म्हणजे,शिक्षा भोगताना एखादं पुस्तक

पुढे वाचा »

माझी वाचन प्रक्रिया

माझी वाचन प्रक्रिया मी सध्या काय वाचतो ? मी कधी वाचतो ? कुणाचे वाचतो ? जे काही वाचतो ते नेमके कसे वाचतो ? वाचताना काय काय करतो ? वाचल्यावर काय करतो? असे काही प्रश्न माझ्याविषयी एक लेखक म्हणून पडत असतात

पुढे वाचा »

माझी वाचन प्रेरणा

माझी वाचन प्रेरणा माझे बालपण पिंपळनेर सारख्या ग्रामीण परंतु सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असणार्‍या गावात गेले . वाचनाचा वारसा आमच्या वडिलांकडून माझ्यापर्यंत आला .आमचे वडील कैलासवासी मोतीराम संपत चौधरी हे स्वातंत्र्यसैनिक होते . हौशी रंगभूमीवरील कलावंत होते .पौराणिक नाटकातील स्त्री पात्रे प्रामुख्याने

पुढे वाचा »

शिक्षणयात्रीमध्ये नेमके काय आहे?

शिक्षकांचं हक्काच अभिव्यक्तिपीठ म्हणजे ‘शिक्षणयात्री’

शिक्षणाचा केवळ साक्षर बनविणे हा मर्यादित हेतू नसतोच कधी.शिक्षण म्हणजे खुप काही असलं तरी शिक्षणानं माणुसपण जागलं जावं, आपल्या अंगभूत कलागुणांना संस्कारांची जोड मिळावी यासारख्या अपेक्षा या असणारंच! केवळ खुप शिकला म्हणुन कृत्रिम बडेजावापेक्षा माणुसकी जपणारी माणसं दिसली तर ठिक नाहीतर ” समृध्द ” शिक्षणाची उणीव भासते…असं का?

संस्कारी माणुस होणं हे महत्त्वाचे . व्यक्तीमत्व विकासाच्या प्रवासातील तो एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे . त्यातूनच व्यक्तिमत्व आकार घेत असते. त्याला एक नवी दिशा मिळत असते. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होऊन ते सर्वार्थाने आकार घेत असते. हा सारा प्रवास होत असताना सामाजिक परिस्थिती, होणारे संस्कार आणि शाळेतून मिळणारे शिक्षण या गोष्टी अर्थात खूप महत्त्वाच्या असतात.अशावेळी कर्त्या शिक्षकांचा… संस्कारी शाळांचा शोध घेऊन त्यांचं काम सर्वासमोर आलं पाहिजे,इतरांना प्रेरणा मिळायला हवी .या मौलिक विचारानं मा. पुरुषोत्तम भापकर (तत्कालीन शिक्षण आयुक्त) व शिक्षणयात्री परिवारातील सदस्यांचे चिंतन सुरू होतं. आणि या चिंतनातूनचं ‘शिक्षणयात्री’ मासिकाचा जन्म झाला.